Pune Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Market Committee : पुणे बाजार समितीचा पुनर्विकास की, स्थलांतर?

Pune APMC News : १९७८ साली पुणे शहराच्या बाहेर असलेल्या गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार आता वाढत्या शहरीकरणामुळे शहरामध्ये आला आहे.

Team Agrowon

Pune News : १९७८ साली पुणे शहराच्या बाहेर असलेल्या गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार आता वाढत्या शहरीकरणामुळे शहरामध्ये आला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बाजार समितीमधील व्यवहारांवर परिणाम होत आहे.

परिणामी बाजार समितीचा आवारच रिंगरोड लगत अथवा पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळ परिसरात स्थलांतरित करण्यात यावा, अथवा आहे त्या बाजाराचा पुनर्विकास करण्यात यावा, अशी बाजार घटकांची अनेक दिवसांची मागणी आहे.

या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून, स्थलांतराबाबत आपण राज्य शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी बाजार घटकांना दिले आहे.

दि पूना मर्चंट चेंबरचे मुखपत्र असलेल्या ‘वाणिज्य विश्व’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले.

या कार्यक्रमामध्ये पवार म्हणाले, ‘‘शहरातील मार्केट यार्डची जागा अपुरी पडत आहे, व्यापार वाढीसाठी नव्या जागी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे. शहरालगत काही जागा पाहिल्या आहेत, त्यावर लवकर निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान पुणे बाजार आवाराच्या स्थलांतराबाबत माजी मंत्री विजय शिवतरे यांनी पुरंदर विमानतळा लगत हा बाजार व्हावा आणि हा राष्ट्रीय बाजार व्हावा यासाठी आग्रह धरला आहे. तर माजी सभापती दिलीप खैरे यांनी देखील स्थलांतरा ऐवजी आहे पुनर्विकास करण्याची योजना आखली होती. या योजनेला काही बाजार घटकांनी विरोध केल्याने पुनर्विकास रखडला होता.

पुण्यात सेस नको : बाठिया

चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘श्री. पवार यांचे व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य राहिले आहे, ते आमचे आधारस्तंभ आहेत. पुण्याचा व्यापार वाढला पाहिजे यासाठी ते सदैव आग्रही आहेत. अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव मदत करतात. ई-कॉमर्समुळे सध्या पारंपरिक व्यापारापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हा व्यापार टिकलाच पाहिजे.

त्यासाठी व्यापाऱ्यांच्या अडचणी सुटायला हव्यात. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा बाजार समित्यांच्या भुसार विभागांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल येतच नाही. त्यामुळे तेथे एक टक्का सेसची अंमलबजावणी करू नये, तसेच बाजार नियमन करू नये,’’ अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT