Electricity Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Recovery : चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

Mahavitaran : चालू आर्थिक वर्षात बारामती परिमंडलाची लघूदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांची मार्चअखेर ४४ कोटी रुपये असलेली थकबाकीची रक्कम १४४ कोटींवर गेली आहे.

Team Agrowon

Baramati News : वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी. तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरण पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले.

पुणे महावितरण विभागाच्या बारामती येथील ऊर्जाभवन सभागृहात बुधवारी (ता. ९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य अभियंता अंकुश नाळे, अधीक्षक अभियंते दीपक लहामगे, बाळासाहेब हळनोर, सुनील माने, सहायक महाव्यवस्थापक कीर्ती भोसले, सहायक महाव्यस्थापक धैर्यशील गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. खंदारे म्हणाले, की चालू आर्थिक वर्षात बारामती परिमंडलाची लघूदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांची मार्चअखेर ४४ कोटी रुपये असलेली थकबाकीची रक्कम १४४ कोटींवर गेली आहे.

ॲग्रो विशेष

ही रक्कम वसूल करण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा तयार करून त्यावर काम करावे लागेल. शिवाय चालू बिले शंभर टक्के अधिक थकबाकी वसूल करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जनमित्रांपासून वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

आपल्या कामांचा आलेख हा नेहमी चढताच असला पाहिजे. पंतप्रधान सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी अनेक लोकाभिमुख योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ मुळे शेतीला दिवसा वीज देणे शक्य होणार आहे. त्याकरिता या योजनांच्या कामांना गती द्यावी. तसेच वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वीज जोडणी वेळेत द्यावेत व तक्रार निवारण करण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT