Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Arrival : नगर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक

Onion Market : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरवड्यापासून कांद्याची विक्रमी आवक सुरूच आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरवड्यापासून कांद्याची विक्रमी आवक सुरूच आहे. शनिवारी (ता. १३) झालेल्या लिलावातही १ लाख २ हजार गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटलला २१०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कांद्याला दर कमी असतानाही आवक मात्र वाढतीच आहे.

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी लिलाव होतात. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत पुन्हा कांद्याची आवक वाढली आहे. निर्यातबंदीमुळे गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर उतरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे दोन हजारांवर आल्याने काही शेतकरी संघटनांनी बाजार समितीसमोर आंदोलन केले होते. गेल्या आठवड्यात दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याच्या दराला कासवगतीने वाढ मिळत असल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.

असे असले तरी गेल्या १५ दिवसांचा विचार करता बाजार समिती कांदा गोण्यांची विक्रमी आवक होत आहे. सध्या लिलावाला केवळ नगर बाजार समितीत १ लाखापेक्षा अधिक गोण्या येत आहेत. अलीकडच्या काळातील ही विक्रमी आवक आहे.

शनिवारचा कांद्याचा प्रतिक्विंटल दर (रुपये)

१ नंबर कांदा १८०० ते २४००

२ नंबर कांदा १२०० ते १८००

३ नंबर कांदा ६०० ते १२००

४ नंबर कांदा २०० ते ६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT