Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Market : रिसोडला हळदीची विक्रमी ६५०० क्विंटल आवक

Turmeric Rate : स्थानिक बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक होत असून उच्चांकी १५५०० रुपये दर मिळाला आहेत.

Team Agrowon

Washim News : स्थानिक बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक होत असून उच्चांकी १५५०० रुपये दर मिळाला आहेत. बुधवारी (ता. १०) साडेसहा हजार क्विंटल आवक झाली.

हळदीला सरासरी १४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारपासून या बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहनांना आत सोडण्यात आले.

नाणे टंचाईचे कारण पुढे करून येथील बाजार समिती २३ मार्चपासूनच बंद करण्यात आली होती. सोमवारपासून (ता. ८) बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यात आली. गुरुवारी व रविवारी असे दोन दिवस हळद खरेदी-विक्री केली जाते.

गुरुवारी (ता. ११) रमजान ईदची सुट्टी असल्यामुळे बुधवारी (ता. १०) हळदीची खरेदी करण्यात आली. हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून, हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी विक्रीसाठी एकच गर्दी करत असल्याची दिसून येत आहे.

मागील काही वर्षांत तालुक्यासह जिल्ह्यात हळदीच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय येथील बाजार समितीत मेहकर, लोणार, मालेगाव तसेच मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी येत असते.

यावर्षी हळदीचे दर वाढण्याची संकेत असून दर टिकून राहिल्यास हळद लागवडीत वाढ होणार आहे. सध्या हळदीच्या बेण्याचा तुटवडा निर्माण झाला असून परराज्यातून बेणे शेतकरी खरेदी करीत आहेत. बुधवारी येथील बाजार समितीत हळदीची विक्रमी ६५०० क्विंटल आवक झाली. कमाल दर १५५०० रुपये असून सरासरी दर १४ हजार रुपयांपर्यंत मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT