Tur Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Variety : तुरीच्या ‘बीडीएनपीएच १८-५ संकरित वाणाची शिफारस

Tur Hybrid Variety : डॉ. के. टी. जाधव ः भारताच्या मध्य विभागासाठी लागू

Team Agrowon

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
BDNPH 18-5 : छत्रपती संभाजीनगर : बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे विकसित तुरीच्या ‘बीडीएनपीएच १८-५’ या संकरित वाणाची भारताच्या मध्य विभागासाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती केंद्राचे प्रभारी डॉ. के. टी. जाधव यांनी दिली.

अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्याद्वारे घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीत ही शिफारस करण्यात आली. बदनापूर कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेले ‘बीडीएन-७११,’ ‘गोदावरी’ आदी पांढऱ्या रंगाचे तुरीचे वाण शेतकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरले आहे. याबरोबरच ‘बीडीएन ७१६’, ‘बीएसएमआर ७३६’ हे केंद्राने संशोधित केलेले लाल तुरीचे वाण आहे. यापूर्वी ‘बीएसएमआर ८५३’ हा या केंद्राने संशोधित केलेला तुरीचा वाण खूप प्रचलित होता.

डॉ. जाधव म्हणाले, ‘‘जीटीएच १’ हा भारतातील मध्य विभागासाठी प्रसारित केलेला पहिला संकरित तूर वाण आहे. तो गुजरातमधील आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांद्वारे शिफारस करण्यात आलेले ‘बीडीएनपीएच १८-५’ हे पहिलेच तुरीचे संकरित वाण आहे. रंगाने पांढऱ्या‍ असणाऱ्या या वाणाची उत्पादकता १७५९ ते २१५९ किलोग्रॅम प्रतिहेक्टर आहे. हा वाण १५५-१७० दिवसांत तयार होतो. मर आणि वांझ या प्रमुख रोगांना तो मध्यम प्रतिकारक आहे.

डॉ. डी. के. पाटील, डॉ. व्ही. के. गिते या शास्त्रज्ञांनी डॉ. के. टी. जाधव, प्रशांत सोनटक्के आणि डॉ. ज्ञानेश्‍वर मुटकुळे यांच्या सहकार्याने हा वाण विकसित केला. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग, माजी संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तुरीची उत्पादकता वाढविण्यासाठी संकरित वाण निर्मिती हा एक नवीन पर्याय या निमित्ताने यापुढेही वापरला जाईल, असे मत डॉ. जाधव यांनी सांगितले. लवकरच हा वाण शेतकऱ्यांना पुरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT