Flood Management Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Flood Management Kolhapur : संभाव्य महापुराचा धोका ओळखून मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा'

Collector Amol Yedage : ताराराणी सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व कामाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे अमोल येडगे यांनी सूचना दिल्या.

sandeep Shirguppe

Pre-Monsoon Work Kolhapur : संभाव्य महापुरापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा, पूरग्रस्त भागातील नागरिकांची यादी करून आवश्यकता भसल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी पूर्ण करा, धराणातील पाण्याच्या विसर्गाचेही नियोजन करा, वीज, औषधे, चारा यांची व्यवस्था करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आज ताराराणी सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाकडे तीन आठवडे असून, आवश्यक नालेसफाई, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही, रस्ते पुलांचे परीक्षण करून योग्य निर्णय घेणे, नागरिक व पशुधनासाठी निवाऱ्याची सुविधा आदी कामांबाबत तातडीने नियोजन करा, भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांची यादी तयार करून प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांबाबत तयारी करा, राष्ट्रीय आपत्ती कृती दल, जिल्हा आपत्ती चमूला कधी पाचारण करायचे, याबाबत तालुकास्तरावर नियोजन करा.

याव्यतिरीक्त संभाव्य पूरस्थिती तालुक्यातील आपत्ती निवारणविषयक साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करा, रस्ते, नदी-नाल्यांवरील पूल तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावा, पावसाचा अंदाज यावेळी चांगला असल्यामुळे पूरस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, प्रत्येक गाव आणि शहरांमधील धोकादायक इमारती, होर्डिंग तसेच पावसामध्ये धोका निर्माण होईल, अशी ठिकाणे यांची तपासणी करून कडक कारवाई करून ती हटवा, भीतीचे वातावरण तयार होणार नाही, याचीही काळजी घ्या.’

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

जिल्ह्यातील गेल्या ५ वर्षांतील सरासरी पाऊस (मिलिमीटर)

२०१९- २९३०

२०२०- २०३४

२०२१-१७१९

२०२२-१५५२

२०२३- ११७१

जीवितहानी होऊ नये यासाठी नियोजन करा

कोल्हापूर शहरातही मागील वर्षी ४२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१९ च्या पुरामध्ये जिल्ह्यात पूर्णतः वेढा पडलेली २७ गावे होती. अंशतः ३१८ गावे बाधित झाली होती. २०२१ मध्ये नदीकाठी असणाऱ्या ३९१ गावांमधे पूरस्थिती होती. २०१९ च्या पुरावेळी १२ तालुक्यांमध्ये एकूण १ लाख २ हजार ५५७ कुटुंबांना, तर २०२१ मध्ये ७२ हजार ४११ कुटुंबांना स्थलांतरित केले होते. २०१९ पासून वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४, पुरात वाहून गेलेली मनुष्य संख्या १६ आहे, तर १७९ लहान व ४७० मोठी जनावरे दगावली आहेत. सध्या भूस्खलन गावांची संख्या ८६ आहे. या आकडेवारीच्या अनुषंगाने यावेळी कोणतीही जीवितहानी होता कामा, नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT