Ravikant Tupakr Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक बेकायदेशीर ; जामीन मंजूर

Soybean Cotton Farmers Issue : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तुपकर यांनी शुक्रवारी (ता.१९) रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती.

Mahesh Gaikwad

Pune News : राज्यातील कापूस-सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तुपकर यांनी शुक्रवारी (ता.१९) रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्त आक्रमक झाले होते.

बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांना गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरा घाटातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, बुलडाणा सत्र न्यायालयाने तुपकरांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना जामीन मंजूर केला आहे.

आम्ही थांबणार नाही....

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मला झालेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे. सरकारने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करु" असेही ते म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तुपकर यांनी सोयाबीन-कापूस दराच्या प्रश्नांवरून रान उठवले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १९ जानेवारीला रेल रोको आंदोलनाचा इशारा तुपकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

तुपकर झाले होते भूमिगत

आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आपल्याला अटक करतील म्हणून तुपकर भूमिगत झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना राजुरा घाटातून ताब्यात घेतले. १९ जानेवारीला तुपकर मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करणार होते. तुपकरांनी मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता.

रेल रोको आंदोलनाच्या तुपकर यांच्या इशाऱ्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. मात्र, ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. आपले आंदोलन रोखण्यासाठी पोलीस दडपशाही करतील अशी शंका असल्याने ते भूमिगत झाले होते.

दरम्यान, मलकापूरला पोहचण्यापूर्वीच बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले. यावेळी तुपकर यांनी मी गुन्हा केला नसून मला अटक का करण्यात आली आहे, असा सवाल अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना विचारला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT