Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : 'त्यांनी स्वत:साठी तडजोड केली, पण मी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अपक्ष लढणार'; तुपकरांचा एल्गार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. तसेच आपण कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर जिल्ह्यातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सध्या नेत्यांच्या गाठी भेटी आणि बैठकांना जोर आला आहे. यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटेनेला मात्र बजर धक्का बसला असून बुलढाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा देताना आपण लोकसभा निवडणूक लढवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच तुपकर यांनी शहरासह ग्रामीण भागात जनता, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे.

माझा गुरू हा शेतकरी

पुढे तुपकर म्हणाले, 'सध्या राज्यात शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणताही नेता बोलताना दिसत नाही. तर राजू शेट्टी यांनी फक्त आपल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीशी समझोता केला'. 'शेट्टी यांनी बुलढाण्याच्या जागेसाठी देखील आग्रही धरायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही असा आरोप तुपकर यांनी केला आहे. तसेच तुपकर यांनी, 'मी शेट्टी यांना माझा गुरू मानत नाही. माझ्यासाठी माझा गुरू हा शेतकरी आहे. तर मला संसदेत कापूस, सोयाबिन, ग्रामीण आणि शहरी लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत, असे म्हटले आहे.

जनताच माझा विजय निश्चित करेल

'ही निवडणूक मी लढणार असून हा निर्णय जनतेचा आग्रहासाठी घेतला आहे. यामुळेच मतदार संघात प्रचार सुरू केला असून मतदार संघ पिंजून काढणार', असेही तुपकर यांनी म्हटलं आहे. तसेच 'या निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक असेल. जनताच माझा विजय निश्चित करेल, असा विश्वास देखील तुपकर यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक लढण्याचा निर्णय

तर निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकल्याचा टोला तुपकर यांनी लगावत जिल्हाला विकासाच्या रोल मॉडेल करू असे म्हटले आहे. तसेच 'सोयाबीन कापसाच्या प्रश्नाचा आवाज दिल्लीतील सभागृहात घुमवू', असेही तुपकर यांनी म्हटले आहे.

शेतकरी हाच माझा पक्ष

'भविष्यात निवडणुकीचा निकाल काहीही असो मी धनशक्ती विरोधात लढणार आहे. माझ्यासाठी शेतकरी हाच माझा पक्ष असून मी शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने या निवडणूकीला समोर जाणार आणि निवडणून ही येणार', असे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकरी संघटनेशी तुपकर यांनी फारकत घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

शेट्टी हे फक्त स्वतःच पाहतात

यादरम्यान तुपकर यांनी, शेतकऱ्यांच्या जीवावर आतापर्यंत राजू शेट्टींसह अनेक नेते आमदार, खासदार झाले. शेतकऱ्यांच्या पैशांवर वर्गणीतून त्यांनी निवडणूका लढवल्या असे म्हणत शेट्टी हे फक्त स्वतःच पाहतात, ते स्वतःचा विचार करतात अशी टीका केली आहे. तर शेट्टी यांच्या भूमिकेशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्यांना जी भूमिका घ्यायची आहे ती त्यांनी घ्यावी. तर येथे लढत थेट माझ्याशी होणार असून लोकवर्गणीतून ही निवडणूक लढणार आहे, असे तुपकर यांनी म्हटले आहे.

तसेच संघटना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यांनी काय निर्णय घायचा तो घ्यावा. आता मला शेतकरी मदत करत आहेत. शेतकऱ्यांचा नेता म्हणून दिल्लीत पाठवत आहेत. याची सगळी तयारी झाल्याचे तुपकरांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT