Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Issue : रविकांत तुपकरांनी दिला नुकसानग्रस्तांना धीर

Flood Situation : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव तालुक्यांत रविवारी (ता. ७) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव तालुक्यांत रविवारी (ता. ७) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले. या नुकसानाची बुधवारी (ता. १०) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाहणी केली.

शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक, जवळा पळसखेड व खामगाव तालुक्यांतील कोलारी, पिंप्री गवळी गावांत भेटी देत नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानग्रस्तांना १०० टक्के भरपाई द्या, अन्यथा नुकसानग्रस्तांना घेऊन आक्रमक आंदोलन करू, असा इशारा देखील दिला.

रविवारी संपूर्ण जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. विशेषतः घाटाखालील खामगाव आणि शेगाव या दोन तालुक्यांमध्ये ढगफुटी झाल्याने नद्यांना पूर आले. हजारो हेक्टर शेतजमीन पिकांसह खरडून गेली. अनेक गावांमध्ये घरांची पडझड होऊन, घरातील अन्नधान्य व साहित्य वाहून गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT