Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : ...अन्यथा वाणिज्य मंत्र्यांच्या घरात कांदा फेकणार ; रविकांत तुपकरांचा इशारा

Ravikant Tupkar On Onion : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Team Agrowon

Akola News : केंद्र सरकारने कांद्यावर लादलेला ४० टक्के निर्यातकराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा वाणिज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी कांदा फेकणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

याबाबत तुपकर यांनी म्हटले की, हा निर्यात कर लादून आणखी एक शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. ज्या वेळी सोयाबीन-कापसाचे भाव पडले त्या वेळी केंद्र सरकारने भाव वाढविण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. मात्र, आता टोमॅटो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत आहे, असे दिसताच अनेकांच्या पोटात दुखायला लागले.

केंद्र सरकारनेही लगेच भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविण्यास सुरुवात केली. विशिष्ट मतदारवर्ग टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांना मारण्याचे धोरण राबविले जात आहे. कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडणार असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. केंद्र सरकारने तातडीने ४० टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कांदा फेकू, असा इशारा तुपकर यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT