Tax Recovery  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Tax Recovery : ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली वेगात सुरू

Rural Administration : मार्च महिना जवळ आल्याने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ३३६ कोटी २६ लाख रुपयांची घरपट्टीची करवसुली केली.

Team Agrowon

Pune News : मार्च महिना जवळ आल्याने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ३३६ कोटी २६ लाख रुपयांची घरपट्टीची करवसुली केली.

घरपट्टी वसुलीचे हे प्रमाण ६१.६० टक्के इतके आहे. तसेच पाणीपट्टीतून ४३ कोटी ५५ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली असून, त्याचे प्रमाण ५६.९० टक्के इतके आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील मुळशी, खेड, मावळ तालुक्यांत ६४ टक्क्यांहून अधिक घरपट्टीची करवसुली झाली आहे. तर आंबेगाव तालुक्यात सर्वांत कमी ४५.९२ टक्के वसुली झाली आहे. भोर तालुक्यात ६८ टक्के पाणीपट्टी वसुली करण्यात आली असून, त्यातून ग्रामपंचायतींना दोन कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जुन्नर तालुक्यात सहा कोटी १४ लाख रुपये, मावळमध्ये पाच कोटी ९५ लाख रुपये, बारामतीमध्ये चार कोटी ७२ लाख रुपये, खेडमध्ये तीन कोटी २९ लाख, तर मुळशी तालुक्यात तीन कोटी १६ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींकडून अजूनही पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुली सुरू आहे. त्याबाबत वेळोवेळी तालुकास्तरावरून आढावा घेण्यात येत आहे. थकबाकी जास्तीत जास्त वसुली करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. कर वसुलीच्या उद्दिष्टापर्यंत ग्रामपंचायती पोचतील अशी अपेक्षा आहे.
- विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि. परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT