Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : सिंचनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वेगाने घट

Irrigation Project : रब्बी हंगामातील पिकांसाठी होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

Team Agrowon

Dharashiv News : रब्बी हंगामातील पिकांसाठी होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात दोन टक्के घट झाली आहे. एकूण २२६ प्रकल्पांत सध्या ७२.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या आठवड्यात प्रकल्पांमध्ये ७४.८० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मागील वर्षी यावेळी हा पाणीसाठा १२.९३ टक्के होता. सर्वांत मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठाही २ टक्क्यांनी आटला आहे. मागील आठवड्यात ९६.३६ टक्के असलेला उपयुक्त पाणीसाठा सध्या ९४.७२ टक्क्यांवर आहे.

जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा गेल्या आठवड्यात ८२.२८ टक्के होता. तो आता ८०.८० टक्के आहे. तसेच, २०८ लघू प्रकल्पांत ६६.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो देखील दोन टक्क्यांनी कमी होऊन ६४.७० टक्के झाला आहे.

जिल्ह्यात अजूनही २१ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. त्यात मध्यम एक, तर २० लघू प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असलेले १०६ प्रकल्प आहेत. त्यात लघू ९५, मध्यम १० आणि एका मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच, ३४ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामध्ये ३१ लघू आणि तीन मध्यम प्रकल्प आहेत.

दोन लाख प्रवाशांची सोय

जिल्ह्यातील ३४ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांखाली आहे. त्यामध्ये ३३ लघू आणि एक मध्यम प्रकल्प आहे. याशिवाय २२ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २५ टक्क्यांखाली आहे. यामध्ये २० लघू, तर दोन मध्यम प्रकल्प आहेत. तसेच, नऊ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे.

५० टक्क्यांखालील प्रकल्प

खंडेश्वर, साकत, हरणी, कोलेगाव ल.पा, गोपालवाडी, उपळा, कोंड, नितळी, शिराढोण, भाटसांगवी, येडेश्वरी, आडसुळवाडी, दुधाळवाडी, गोरमाळा, हिवर्डा, जांब, वांगी जवळा, सोनारी, यशवंडी, अंबी, जेजली, मुगाव, शेळगाव, वाटेफळ, अनाळा, येमाई, धिवरी उमरगा, पिंपळी, अरळी, कुनसावळी, सिंदगाव, सलगरा मड्डी, हंगरगा, व्होर्टी, केमवाडी, देवकुरळी, कदमवाडी, केशेगाव, नंदगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT