Rakesh Tikait On Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

MP Farmer Protest On soybean : मध्य प्रदेशमधील सोयाबीन आंदोलनात राकेश टिकैत यांची एंट्री; थेट कृषिमंत्री चौहान यांना आव्हान?

Rakesh Tikait On Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांनी सोयाबीन हमिभावाच्या दरात वाढ करण्यात यावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी राज्यातील विविध भागात आंदोलने केली आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मध्य प्रदेशमधील शेतकरी सोयाबीनला किमान ६ हजार रुपये आधारभूत किमती (एमएसपी) मिळावी यासाठी आक्रमक झाले आहेत. पण राज्य सरकारसह केंद्र सरकार त्यांची मागणी मान्य करत नाही. त्यावरून भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी थेट कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर आम्हाला आंदोलनात उतरावे लागेल असे म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील शेतकरी सोयाबीनला किमान सहा हजार रुपये एमएसपीची किंमत मिळावी म्हणून आक्रमक झाले आहेत. राज्यभर सोयाबीनसाच्या दरासाठी आंदोलने केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना ग्रामस्थांकडून निवेदन दिली जात आहेत. पण शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप विचार करण्यात आलेला नाही. गेल्या हंगामात ४,६०० रुपयांचा हमीभाव सोयाबीनला दिला होता. त्यात आता २९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर आता २०२४-२५ या वर्षाकरिता ४,८९२ रुपये असा दर सोयाबीनला दर मिळणार आहे.

पण राज्यातील शेतकरी ६ हजार रुपयांवर ठाम असून आंदोलने सुरूच आहेत. आता या आंदोनात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची एंट्री झाली आहे. टिकैत यांनी, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाना साधला आहे. राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

टिकैत यांनी, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, देशाचे कृषिमंत्री मध्य प्रदेशचेच आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर तेथील शेतकऱ्यांच्यासाठी आम्हाला उतरावे लागेल. आम्ही त्यांची मदत करू. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांची अवस्था सर्वात वाईट असल्याचेही टिकैत यांनी म्हटले आहे.

यावेळी युनियनचे प्रांतीय मंत्री भरत सिंह बैस यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, उज्जैनमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली, ज्यामध्ये ४ हजार ट्रॅक्टर सहभागी झाले होते. सरकारने सोयाबीनला दिलेला ४८९२ रूपयांचा हमीभाव हा महासागरात थेंबाप्रमाणे आहे. या भावात सोयाबीन लागवडीचा खर्चही निघत नाही. शेतकऱ्याला सोयाबीन तोट्यात विकावे लागत आहे. त्यामुळे सोयाबीनला हमीभाव ६००० रुपये प्रति क्विंटल मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT