Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : संघर्ष ऊसदराचा! तोडगा न निघाल्यास राजू शेट्टी महामार्ग रोखणार

Sugarcane Price : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

sandeep Shirguppe

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काल चक्का जाम आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यावर्षीच्या उसाला तीन हजार ५०० पहिली उचल द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मागच्या २ महिन्यांपासून करण्यात येत आहे. यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर, सांगली महामार्गासह ग्रामीण भागातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रविवारी (ता. २६) राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथे दिला.

उसाला अपेक्षित दर मिळावा, यासाठी शेट्टी यांनी तेरा सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. २१ दिवस आक्रोश पदयात्रा काढून उसाला दर द्यावा, या मागणीचे निवेदन साखर कारखान्यांना दिले. त्याशिवाय तोडगा निघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र, हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यामुळे शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस असणाऱ्या भागांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

काही मार्गावरील बससेवा सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुपारनंतर सर्व वाहतूक सुरळीत सुरू झाली. मंगळवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटना, कारखानदार आणि प्रशासनाची समन्वय बैठक होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

येथे झाली आंदोलने... जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल

दोन तासांहून अधिक काळ चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस-इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, तावडे हॉटेल, शिये, हातकणंगले.

भोगावती, कोपार्डे, उत्तूर, शाहूवाडी, बांबवडे, अडकूर, पाटणे फाटा, कोवाड, आदी ठिकाणी आंदोलन झाले. यावेळी श्री. शेट्टी यांच्यासह 'स्वाभिमानी'च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT