Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : गत हंगामातील शेतकऱ्यांचे १०० रुपये द्या; राजू शेट्टींची पालकमंत्री मुश्रीफांकडे मागणी

Sugarcane Farmer : ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेतली.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : गत हंगामातील ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी झालेल्या ऊस आंदोलना दरम्यान सन २२ -२३ या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ठरल्याप्रमाणे प्रतिटन १०० रूपये व ५० रूपये दुसरा हप्ता देण्याचे प्रस्ताव कारखान्यांनी शासनाकडे सादर केले आहेत.

परंतु सदर प्रस्तावांना मान्यता देवून ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन केली.

याबरोबरच कोल्हापूर जिल्हयात यावर्षी दुष्काळाचा दाहक परिस्थिती निर्माण झालेली असून पावसाळा तोंडावर आला तरी याबाबत शासनाने पिकाचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.

विशेषत शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यातील डोंगरी भागातील ऊसासह अन्य पिके पाण्याविना करपली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले घास गेला आहे. अनेक तालुक्यातील गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

याबाबत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, मी ठरल्याप्रमाणे आचारसहिंता संपल्यानंतर मुख्य सचिव यांना भेटून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर तातडीने सदर प्रस्तावांना मान्यता देवून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला असून संबधित विभागास ऊपाययोजना बाबत सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Sugarcane Crushing: खानदेशात २३ लाख टनांवर ऊस गाळप

Natural Farming: वाशीम जिल्ह्याची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

Agriculture Support: शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करा: पालकमंत्री संजय शिरसाट

SCROLL FOR NEXT