Ethanol Production agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॅालनिर्मीती बंदीवरून राजू शेट्टींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Ban on Ethanol Production : इथेनॉल निर्मीतीवर बंदी घातल्याने शेतकरी आणि कारखानदार यांना तोटा होणार असल्याचे पत्र राजू शेट्टी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिहले आहे.

sandeep Shirguppe

Raju Shetti PM Narendra Modi : केंद्र सरकारने इथेनॅालनिर्मीतीवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे दुहेरी परिणाम आहेत. एकीकडे, इथेनॉल उत्पादनाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेल्या कारखानदार व शेतकऱ्यांवर आता कर्जाची परतफेड आणि इथेनॉल प्रक्रिया टिकवून ठेवण्याचे ओझे आहे.

दुसरीकडे, निर्बंधामुळे इंधनासाठी इथेनॉल पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे साखर कारखान्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान होते आणि सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामध्ये अडथळा निर्माण होणार असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, वास्तविक पाहता साखर उद्योगाला स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॅाल निर्मीतीचा घेतलेला निर्णय हा महत्वपूर्ण असून याचा ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदार यांना याचा मोठा फायदा झालेला आहे.

मात्र याबरोबरच याच साखर उद्योगामुळे केंद्र सरकारचे पेट्रोल आयात करण्यासाठी लागणारी रक्कमेमध्ये बचत होवून मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचले आहे. त्याचबरोबर कारखान्याकडून इथेनॅाल खरेदी करून थेट पेट्रोलमध्ये मिसळल्याने केंद्र सरकारला प्रतिलिटर ४० ते ४५ रूपये निव्वळ नफा मिळू लागला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसापासून इथेनॅाल निर्मीतीमुळे देशाचे ५४ हजार कोटी रूपयाचे परकीय चलन वाचले असून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ३१८ लाख टनांनी कमी झाले आहे. कारखान्यांकडून ६० रूपये लिटरचे इथेनॅाल खरेदी करून पेट्रोलमध्ये मिश्रण करून १०५ रूपये लिटरने विक्री केल्याने केंद्र सरकारला दरवर्षी २४ हजार ७६० कोटी रूपयाचा नफा होतो.

ऊस उत्पादक शेतकरी आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्र या दोघांनाही फायदा होऊ शकेल यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव ४० रूपये करावा. अन्यथा यामध्ये झालेल्या गुंतवणुकीचे परिणाम भविष्यामध्ये शेतकरी व कारखानदार या दोघानांही भोगावे लागणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT