Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : 'दुसऱ्या हफ्त्याची कोंडी बिद्री साखर कारखान्याने फोडावी'

Sugarcane FRP : उसाला ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देणे शक्य असल्याने तो तातडीने द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी बिद्री कारखान्याकडे केली.

sandeep Shirguppe

Sugarcane : राज्यातील साखर कारखाने मार्चनंतर शिल्लक साखर साठ्याची किंमत सरासरी ३२५० ते ३३०० दाखविले आहेत. कारखान्यांकडे गत गळीत हंगामातील जवळपास ६५ टक्के साखरसाठा शिल्लक आहे. या साखरेला सध्या बाजारात ३७०० ते ३८०० रूपये बाजारभाव मिळू लागले आहेत.

यामुळे गेल्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देणे शक्य असल्याने तो तातडीने द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बिद्री कारखाना कार्यस्थळावर केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेला आक्रोश मोर्चाचे सहाव्या दिवशी बिद्री परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल, ताशा, २५ ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने राजू शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा हार घालण्यात आला.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, कारखानदार व सरकार शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणे गरजेचे असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखर विक्री व उपपदार्थातून मिळालेल्या पैशाची किंमत कमी दाखवून व कागदोपत्री जुळवाजुळव करून ताळेबंद सादर केले आहेत. यावर्षी कारखान्याचा गळीत जास्तीत जास्त ९० दिवस चालणार आहेत यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोड घेण्यासाठी गडबड न करण्याचे आवाहन केले.

यावेळी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने संघटनेच्यावतीने दुसरा हप्ता ४०० रूपये दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू न करण्याचे निवेदन स्वीकारले. निवेदनास उत्तर देताना के. पी. पाटील म्हणाले की शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. पण सध्या निवडणुका सुरू असल्याने बंधने असल्याने निर्णय घेणे अडचणीचे असल्याचे सांगितले.

यावर राजू शेट्टी यांनी आपण निवडणुकीत जाहीरनामा काढणार आहात त्यामध्ये दुसरा हप्ता ४०० रूपये देणार असल्याचे जाहीर करण्यास सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT