Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : 'गनिमी काव्याने महामार्गावर या, लुंग्या सुंग्याना थारा देऊ नका', राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

Sugarcane FRP : उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला.

sandeep Shirguppe

Raju Shetti vs Sugarcane Factory Owners : ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काल मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकही निष्फळ ठरली. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. त्यामुळे आज, गुरुवारी सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका घेऊन कोल्हापूर पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि जयसिंगपूर मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्रीपासून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५०० पेक्षा अधिक पोलीस, अग्निशमनचे बंब आंदोलन स्थळी तैनात केले आहेत.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील चारशे रुपये मागत होतो, आम्ही तीन पावले मागे आलो आहोत. दोनशेवरून शंभर रुपये दिले तरी चालतील; पण, ते दिलेच पाहिजेत. काही कारखाने देण्यास तयार आहेत; पण, सरकार त्यात आडकाठी आणत होते. आता हे पैसे दिले तर आयुक्त त्यांना मान्यता देतील, असे सहकारमंत्र्यांनीच सांगितल्याने कारखान्यांनी तसे जाहीर करावे असे आवाहन केले आहे.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत म्हणाले की, पुणे, बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी मी निघालो आहे. कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन माझ्या शेतकऱ्यांना हक्क मिळवून द्या असं साकडे घालणार आहे.

यानंतर मी महामार्गावर जाऊन बसणार आहे माझ्या बऱ्याच सहकार्यांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण मी पोलिसांना चुकवून महामार्गावर जाणार आहे. जे शेतकरी मागे राहणार आहेत त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आम्ही जोपर्यंत रस्त्यावर आहे तोपर्यंत साखर कारखाने चालू करू देऊ नयेत.

कारखानदार तुमच्या उसाची त्यांना लचके तोडणार आहेत परंतु कारखानदारांना मागच्या वर्षाचे आणि यंदाचे जादा पैसे द्यायचे नाहीत तसेच त्यांना शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढायची आहे. यामुळे हातात बुडखा घेऊन तुमचा ऊस सांभाळत बसा असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT