Bedana  Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Market : गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून

Bedana Rate : गेल्या महिनाभरात देशभरातून बेदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याचा चांगला उठावही होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली ः गेल्या महिनाभरात देशभरातून बेदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याचा चांगला उठावही होत आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २१० रुपये दर मिळत आहे.

गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असून दर स्थिर राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत देशातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी लगबग करत आहेत. सध्या बाजारात बेदाण्याची मागणी वाढली असल्याने उठावही होत आहे. दर टिकून असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे. राज्यात गतवर्षी सुमारे ३ लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. गतवर्षी फेब्रुवारीपासून नव्या बेदाण्याची विक्री सुरू झाली.

अकरा महिन्यांत २ लाख ६० हजार टन बेदाणा डिसेंबरअखेर विक्री झाला. राज्यात ३१ डिसेंबरअखेर ४० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. गेल्या महिन्याभरापासून दर स्थिर आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जवळापास ८० ते ९० टक्के बेदाण्याची विक्री होईल.

पुढील महिन्यातही दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. त्यामुळे शेडच्या दुरुस्तीची लगबग सुरू असली तरी, दुरुस्तीला फारशी गती आलेली नाही. नागज परिसरात बेदाणा तयार करण्यासाठी दहा ते पंधरा शेड सज्ज झाले आहेत.

दरम्यान, देशभरात द्राक्षांची विक्री सुरू असून विक्री करून राहिलेल्या द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी बेदाणा शेड मालकांकडे चौकशी करत आहेत. तीन ते चार शेडवर द्राक्ष विक्री करून राहिलेल्या द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत.

बेदाण्याचे प्रतवारीनुसार दर (प्रति किलो)
हिरवा...१००-२१०
पिवळा...१००-१९०

गेल्या महिन्यापासून बेदाण्याला चांगली मागणी असून उठाव होत आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून आहेत. गत वर्षीच्या हंगामातील फेब्रुवारीअखेर पुरेल इतका बेदाणा शिल्लक आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT