Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain : मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस

Monsoon Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत काही भागांत शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत काही भागांत शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता, त्यामुळे ओढे व नाल्यांना पाणी आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला. घनसावंगीत मध्यम स्वरूपाचा पाऊस. कुंभार पिंपळगाव परिसरात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ कधी जोराचा पाऊस, तर कधी ऊन अशी स्थिती होती.

रोहिलागड परिसरातील किनगाव, किनगाववाडी, नांदी, धनगर पिंपळगाव परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले होते. कडवंची येथे १४ मिलिमीटर, नंदापूर ११ मिलिमीटर, खरपुडी १७.६० मिलिमीटर तर पोकळ वडगाव येथील ८.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १६.९ मिलिमीटर पाऊस झाला. बीड व जालनाच्या तुलनेत संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळी ६.३० च्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. आळंद परिसरात अर्धा तास रिमझिम पाऊस झाला.

घाटनांद्रा परिसरात मॉन्सूनच्या पावसाची वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. वैजापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पैठण तालुक्यातील देवगाव येथे सुमारे ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बीड जिल्ह्यातील बीड व केज तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होतात. बीड तालुक्यात सरासरी १५.९ मिलिमीटर, तर केज तालुक्यात सरासरी १२.३ मिलिमीटर पाऊस झाला. त्या पाठोपाठ शिरूर कासार तालुक्यात ११.४ मिलिमीटर, आष्टी ७.७ मिलिमीटर, पाटोदा ६.४ मिलिमीटर, वडवणी ५.५ मिलिमीटर, माजलगाव ४.८ मिलिमीटर, परळी ३.९ मिलिमीटर तर धारूर तालुक्यात सरासरी ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेवराई व अंबाजोगाई तालुक्यात पावसाची तुरळक सर झाली.

अधूनमधून होत असलेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडते आहे. उशिरा काढणीस येणाऱ्या गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी .
-संजय मोरे पाटील, शेतकरी नळविहिरा ता. जाफराबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

SCROLL FOR NEXT