Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : दोन जिल्ह्यांत पावसाचा १३ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : अवकाळी पावसाने जवळपास १२ हजार ८५९ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांत २६ आणि २७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास १२ हजार ८५९ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून अंतिम क्षेत्र लवकरच कळणार आहे.

आधी खरिपात पावसाने मांडलेल्या खेळाने पिकाची पुरती वाताहत झाली. आता पुन्हा रब्बीतील पीक काढण्याच्या तोंडावर असताना पाऊस व गारपिटीने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील काही तालुक्यांतील पिकांचे नुकसान केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव आदी तालुक्यांत झाला. परंतु कृषीच्या प्राथमिक अंदाजानुसार, वैजापूर तालुक्यातील १४ गावांतील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे जवळपास १२६६ हेक्टरवर ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

त्यापाठोपाठ कन्नड तालुक्यातील १४ गावांत ४९५ हेक्‍टर पिकांना तर सोयगाव तालुक्यातील एका गावातील तीन हेक्टर गव्हाच्या पिकाला दणका बसला आहे.

जालना जिल्ह्यात जाफराबाद व भोकरदन तालुक्यात तब्बल ११ हजार ९५ हेक्‍टरवर नुकसान केले. त्यामध्ये जाफराबादमधील १८ गावांतील १९२६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान क्षेत्रात ३६५८ हेक्टरवरील जिरायती, १८६५ बागायती, १५२ हेक्टरवरील फळपिके तर ४२०० हेक्टरवरील भाजीपाला पिकांचा समावेश आहे. भोकरदन तालुक्यातील ४८ गावांतील १५४१ शेतकऱ्यांच्या जिरायती रब्बी ज्वारी, बागायती गहू, मका, हरभरा, फळपिकात डाळिंब, मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT