Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Damages Crops : काढणीला आलेल्या ज्वारीला फुटले कोंब

Heavy Rain Crop Loss : ज्वारीची काढणी करून लागलीच मळणीही उरकून घ्यायची म्हणून आदल्या दिवशी सगळी तयारी केली. मात्र त्याच रात्री पावसाने पकडलेली पाठ आजपर्यंत सोडली नाही.

Team Agrowon

Satara News : ज्वारीची काढणी करून लागलीच मळणीही उरकून घ्यायची म्हणून आदल्या दिवशी सगळी तयारी केली. मात्र त्याच रात्री पावसाने पकडलेली पाठ आजपर्यंत सोडली नाही. आता काढणी अन् मळणीची गरजच उरली नाही, कारण ज्वारीला शेतात उभ्या उभ्या पुन्हा कोंब फुटले.

मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील शेतकरी विजय पाटील हताशपणे सांगत होते. संततधार पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचीही अशीच गत झाली असून तोंडचा घास हिरावल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे परिसरात संकरित ज्वारी व उन्हाळी भुईमुगाच्या काढणीचे गणित तर कोलमडले आहेच. शिवाय भाजीपाला तसेच अन्य बागायती पिकांनाही पावसामुळे जबर फटका बसला आहे.

साधारणपणे मॉन्सूनच्या आगमनापूर्वी मे महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाळी ज्वारी व भुईमुगाची काढणी शेतकरी करतात मात्र यंदा काढणीच्या वेळेलाच पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक काढणीविना शेतातच राहिल्याने पावसामुळे उभ्या पिकाला पुन्हा कोंब फुटले आहेत.

या बाबत सांगताना मंद्रुळकोळ्याचे शेतकरी विजय पाटील म्हणाले, खते, फवारणी, मशागतीवर चांगले लक्ष दिल्याने ज्वारीचे पीक चांगले आले. परिसरातून शेतकरी पीक बघायला येत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT