Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather : राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्य

Weather Update : उद्यापासून (ता. २३) राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सध्या उन्हाचा चटका आणि वादळी पावसाचा तडाखा असे हवामान अनुभवायला मिळत आहे. यातच ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २२) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उद्यापासून (ता. २३) राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या विविध भागांत सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती आहे. ढगाळ हवामान असल्याने कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली घसरला आहे. सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३४.७ अंश तापमानाची नोंद झाली. वाशीम येथे ३४.६ अंश, तर सोलापूर आणि सांताक्रूझ येथे ३३ अंशांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येऊन नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार सरी तडाखा देत आहेत. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. आज (ता. २२) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४, अहिल्यानगर ३०.९, जळगाव ३०.८, कोल्हापूर ३०.१, महाबळेश्वर २६.७, मालेगाव ३०, नाशिक २९.५, निफाड २९, सांगली २९.८, सातारा ३०.८, सोलापूर ३३.६, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३४.७, रत्नागिरी ३२.४, छत्रपती संभाजीनगर २९, बीड २९.५, परभणी ३३.२, अकोला २९.३, अमरावती २९.४, भंडारा ३२, बुलडाणा २९.५, ब्रह्मपुरी ३३.७, चंद्रपूर ३२.५, गडचिरोली ३०, गोंदिया ३१.२, नागपूर २९.५, वर्धा २९, वाशीम ३४.६, यवतमाळ ३२.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर.

वाशीम : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.५, परभणी ३५.२, अकोला ३५.१, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT