Sangli Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Sangli Monsoon Update : सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत ३२ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवार (ता. २८) सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते.

Team Agrowon

Sangli Rain News : सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत ३२ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवार (ता. २८) सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. शेतकरी खरीप हंगामातील पिकांची टोकणी आणि पेरणीसाठी नियोजन करू लागला आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वदूर हलका आणि मध्यम पाऊस पडला. शिराळा तालुक्यातील धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागातील भात पिकास नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, भाताची उगवण फारशी झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

दुबार पेरणी करावी लागण्याची स्थिती सध्यातरी नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) थांबूनथांबून पाऊस पडला. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते.

पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग या पिकांसह अन्य पिकांच्या पेरणी आणि टोकणीसाठी नियोजन करू लागला आहे.

कृषी निविष्ठा केंद्रांतून बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. वाफसा आल्यानंतर टोकणी आणि पेरणी केली जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३२ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) मिरज ३०.६, जत ४०.८, विटा २८.४, वाळवा २५, तासगाव ४१.५, शिराळा ४७.९, आटपाडी २६.८, कवठे महांकाळ २३.४, पलूस २४, कडेगाव ३०.१ मिमी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT