Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नगर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी

Rain News : नगर जिल्ह्यात गुरुवारी (ता.६) सायंकाळी नगर शहरासह जिल्हाभरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात गुरुवारी (ता.६) सायंकाळी नगर शहरासह जिल्हाभरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार एका महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकामाला वेग आला असून शेतकरी कापूस लागवड, खरीप पेरण्याच्या तयारीत आहेत.

नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे. राज्यातील अन्य भागाया तुलनेत पाऊस नसला तरी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. गुरुवारी (ता.६) सायंकाळी नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड तालुक्यातील जवळपास ३८ महसूल मंडलात चांगला पाऊस झाला आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अजून कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा, पारनेर, संगमनेर, अकोले तालुक्यांतील अनेक भागात पुरेसा पाऊस नसला तरी पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली. मागील काही दिवसात पाऊस झालेला असल्याने शेतकामाला वेग आला आहे.

खरीप पेरण्याच्या सुरुवातीलाच यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत. प्रामुख्याने उडीद, मुगाची पेरणी अधिक प्रमाणात होत असलेल्या भागात यंदा लवकर पावसाने सुरवात केल्याने मुग, उडदाची अधिक पेरणी होईल असे दिसतेय. शुक्रवारी (ता.७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. उकाडाही कायम होता.

गुरुवारी (ता.६) सकाळी आठवाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नालेगाव ः १२, कापूरवाडी १२, भिंगार ः ११, चिचोंडी ः ३६, चास ः १३, रुईछत्तीशी ः ३२, वाडेगव्हाण ः ११, निघोज ः २०, श्रीगोंदा ः ६४, काष्टी ः ५७, मांडवगण ः ३४, बेलवंडी ः २३, पेंडगाव ः ६२, चिंभळा ः ३९, देवदैठण ः १२, कोळगाव ः २७, कर्जत ः ४६, राशीन ः ६६,

भांबोरा ः ३०, कोंभळी ः ५६, मिरजगाव ः ३३, माही ः ३१, जामखेड ः ३५, अरणगाव ः २३, खर्डा ः ५७, नान्नज ः ४४, नायगाव ः ३०, शेवगाव ः २४, भातकुडगाव ः १०, बोधेगाव ः २६, ढोरजळगाव ः २६, पाथर्डी ः १२, माणिकदौडी ः ३०, टाकळी ः ६२, कोरडगाव ः १२, साकिरवाडी ः २५, राजूर ः २२,

शेंडीः २२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT