Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पश्‍चिम विदर्भासह पावसाचा छत्रपती संभाजीनगरला तडाखा

Crop Damage : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पश्‍चिम विदर्भात पुन्हा शुक्रवारी (ता. १२) वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून त्यांचे नुकसान वाढले आहे.

Team Agrowon

Pune News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पश्‍चिम विदर्भात पुन्हा शुक्रवारी (ता. १२) वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून त्यांचे नुकसान वाढले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील अंभई येथे वादळी पाऊस, तर रहिमाबाद परिसरात शुक्रवारी पुन्हा गारपीट झाली. टाकळी अंबड (घेवरी) येथे दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

सुधाकर धोंडिराम पाचे (वय ६० ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पैठण शहर परिसर, तालुक्यातील लोहगाव परिसर, गंगापूर तालुक्यातील कायगाव तसेच घाटनांद्रा परिसरात पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत जोरदार पाऊस झाला. अंकुश नगर, वडीगोद्रीत पाऊस झाला.

पश्‍चिम विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असून सलग तिसऱ्या दिवशी बुलडाणासह वाशीम जिल्ह्यात काही तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी दिली. मेहकर, मालेगाव, नांदुरा या तालुक्यांत पाऊस झाला.

पुन्हा पिकांचे नुकसान झाले. मेहकर, मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटही झाली. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे मक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सलगच्या पावसाने रब्बीतील गहू, उन्हाळी ज्वारी, मका, टरबूज, लिंबू, पपई अशा पिकांचे नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT