Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting Issue : खानदेशात ऊसतोडणीला पावसाचा फटका; शेतीचे नियोजन विस्कळीत

Rain Impact : खानदेशात ऊस तोडणी सुरू होऊन काही दिवस झालेले असतानाच पाऊस आला आहे. शेतकरी अडचणीत आला असून, शेतांत वाफसा नसल्याने ऊस तोडणीदेखील रखडणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस तोडणी सुरू होऊन काही दिवस झालेले असतानाच पाऊस आला आहे. शेतकरी अडचणीत आला असून, शेतांत वाफसा नसल्याने ऊस तोडणीदेखील रखडणार आहे.

अनेक भागांत ऊस तोडणी सुरू आहे. ऊस तोडणीबाबत अनेक कारखान्यांनी मागील महिन्यात सुरुवात केली होती. यंदा दिवाळीलाच तोडणीचा मुहूर्त व बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु ऑक्टोबरमधील पावसामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले. ऊस तोडणी आता सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने तोडणीवर परिणाम होणार आहे.

अनेक शेतांत तण वाढले होते. अशात स्थितीत कशीबशी ऊस तोडणी सुरू होती. तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणीदेखील केली होती. परंतु पावसाने आणखी अडचण वाढविली आहे. त्यातही उसाच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून ऊस पीक वाढविले आहे.

परंतु तोडणी वेळेत झाल्यास उतारा चांगला मिळतो. तसेच क्षेत्रही लवकर रिकामे होते. त्यात पुढे खोडवा किंवा अन्य पीक कार्यवाही करावी लागते. खानदेशात मागील हंगामात ऊस तोडणी दिवाळीनंतर सुरू झाली होती. यंदाही ऊस तोडणी दिवाळीनंतर सुरू झाली. ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी सध्या तयार नाहीत.

अनेक भागांत मजूर काही दिवस गावी परततील, अशी स्थिती आहे. कारण गारपीट व पावसात उघड्यावर थांबणे शक्य नाही. शुक्रवारी (ता. २८) व शनिवारीदेखील (ता. २८) पाऊस झाला आहे. पावसामुळे उघड्यावर स्वयंपाक करणे, मुलाबाळांचा सांभाळ करणे यासंबंधीच्या अडचणी व अन्य समस्याही तयार झाल्या आहेत.

खानदेशात यंदा सहा साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारात चार व जळगाव जिल्ह्यात दोन कारखाने सुरू होतील. जळगावात चोपडा व मुक्ताईनगर येथे तर नंदुरबारात नवापूर, नंदुरबार, तळोदा व शहादा येथे साखर कारखाने सुरू आहेत. उसाची लागवड नंदुरबारात सर्वाधिक झाली आहे. तेथे सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. धुळ्यातही शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. यंदा एकूण गाळप २७ लाख टनांवर अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT