Banana Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी बागांचे नुकसान

Pre Monsoon Storm: हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. झाडे मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनाम्याची मागणी झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील वारंगाफाटा (ता. कळमनुरी) येथे तसेच परिसरात रविवारी (ता.१८) मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसात बागांतील केळीची झाडे मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. केळी बागा, आंबा तसेच इतर फळपिकांची झाडे मोडून पडली. शेतातील आखाड्यावरील पत्रे उडून गेले. झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. हळद, भुईमूग आदी पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

अशोक पतंगे, सुवर्णमाला कदम, प्रशांत कदम, अशोक पतंगे, पुष्पाबाई पतंगे, सदाशिव कदम आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT