Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Issue : जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाने हानी

Jalgaon Dhule Crop Damage : खानदेशात पावसाने सर्वच पिकांची हानी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून, शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाने सर्वच पिकांची हानी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून, शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

खानदेशात यंदा अतिपाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यानंतरही पावसाचा धूमाकूळ रोज सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात १४५ टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. धुळ्यातही पाऊसमान सरासरीपेक्षा अधिक आहे. तर नंदुरबारातही पाऊसमान १३० टक्क्यांवर गेले आहे. त्यात या महिन्यातही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. दसरा सणाला सुरू झालेला पाऊस दिवाळी तोंडावर असतानाही सुरूच आहे.

सुरुवातीला उडीद, मुगाची हानी झाली. नंतर सोयाबीन व मका हाती येत असतानाच पाऊस सुरू झाला. त्यात सोयाबीन व मक्याचीही माती झाली. पूर्वहंगामी कापूस पिकातही बोंडे काळवंडत असून, पावसाने मोठी हानी त्यात होत आहे. शेतकरी सततच्या पावसाने त्रस्त आहेत. कापूस वेचणी सुरू होत असतानाच पाऊस आला.

त्यात दसरा व दिवाळीला मजूर टंचाईची स्थिती आहे. यात नुकसान पातळी आणखी वाढत आहे. शेतकरी त्रस्त झाले असून, मोठी हानी होत आहे. खानदेशात सुमारे एक लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, उडीद व मका पिकाची हानी झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सुरू आहे. परंतु कुणी दखल घेत नाही, अशी ओरड शेतकरी करीत आहेत.

कापूस पिकाची सर्वाधिक हानी झाली आहे. मजूर उपलब्ध होत नसल्याने बोंडे वेचणीअभावी शेतात पावसाने खराब होत आहेत. नीरभ्र वातावरण नसल्याने कापूस वाळवणूक करता येत नाही. त्यात अधिकचे नुकसान होत आहे. अनेकांचे सोयाबीन पीक मळणीसाठी कापले होते. परंतु मळणीपूर्वीच ते ओले होऊन मोठी नासाडी झाली आहे.

कापूस पिकात ५० ते ६० टक्के नुकसान सर्वत्र झाले आहे. तर सोयाबीनची ९० टक्के हानी झाली आहे. अनेकांचे सोयाबीन पीक कापणी करून त्याची मळणीही होणार नाही, अशी स्थिती आहे. कारण शेतात पाणीच पाणी व मोठे तण आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी पुढे शेत थेट नांगरून त्यात मशागतीचे नियोजन केले आहे. सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. मोठा खर्च पिकांना लागला आहे. हा खर्च वाया गेला आहे. दुसरीकडे नुकसान भरपाईची फक्त घोषणा शासन करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season 2024 : कोल्हापुरात रब्बी हंगाम लांबणार

Agricultural exports : पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत घसरण; बिगर-बासमती तांदळाची निर्यातीही १७ टक्क्यांनी घटली

Agrowon Podcast : कांद्याचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे हरभरा दर ?

Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी

Sugarcane Harvesting : जळगावात ऊस तोडणी लांबणीवर

SCROLL FOR NEXT