Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी

Crop Damage : अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) पुन्हा २२.४ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, चार दिवसांत झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला असून त्यांचे ४३ हजार हेक्‍टरवरील बागांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) पुन्हा २२.४ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, चार दिवसांत झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला असून त्यांचे ४३ हजार हेक्‍टरवरील बागांचे नुकसान झाले.

अमरावती जिल्हा हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड या भागात आहे. गेल्या चार दिवसांत संततधार पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे या भागातील संत्रा बागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले.

गारपीट व पाऊस झाल्यानंतर सरासरी तीन ते चार दिवसांनी फळाच्या देठाजवळ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत गळतीला सुरुवात होते. गारपीट जास्त झाल्यास फळ मार सहन करण्यास असमर्थ ठरते. अशावेळी तत्काळ गळती होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या आंबिया बहरातील हंगामाची फळे झाडावर असून त्यातील ९० टक्‍के फळे गळाल्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांपासून संत्रा बागायतदार नैसर्गिक आपत्तीमुळे जेरीस आले आहेत. शासनाने तत्काळ भरपाईबाबत निर्णय घेत बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

व्हाण (ता. मोर्शी) येथील विजय पुंड या शेतकऱ्याच्या पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. त्यांची सहा ते सात लाख रुपयांची हानी झाली. त्यांच्या शेडमध्ये ८ हजारांवर कुक्‍कुट पक्षी होते. त्यातील ३०० पक्षी (प्रत्येकी ८५ रुपये) दगावले. सात ते आठ टन मका (२२ हजार रुपये टन), ५५ ते ६० बॅग (प्रत्येकी २२०० रुपये बॅग) खाद्य देखील भिजले. गोदामाची भिंत पडल्याने २ ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT