Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed Selling : तेल्हाऱ्यात बनावट कृषी निविष्ठा करणाऱ्या गोदामावर छापा

Fraud With Farmer : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असतानाच बनावट निविष्ठा निर्मिती करून शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार कृषी विभागाच्या कारवाईने समोर आणला आहे.

Team Agrowon

Akola Bogus Seed News : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असतानाच बनावट निविष्ठा निर्मिती करून शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार कृषी विभागाच्या कारवाईने समोर आणला आहे. तेल्हारा एमआयडीसीमध्ये बनावट खत करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

तेल्हारा पोलिसात कृषी अधिकाऱ्यांनी तक्रार केली असून संबंधित मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पंचायत समिती व कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

तेल्हारा एमआयडीसी परिसरात संशयास्पद कृषी निविष्ठा निर्मिती होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. तालुकास्तरीय भरारी पथकाने तपासणी केली. राहुल सरोदे नावाच्या व्यक्तिकडून या गोदामात खतनिर्मिती सुरू होती.

परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यात आली नाही. पोलिसांनी पंचनामा करून कारवाई केली. नामदेव अॅग्रो या नावाने ही खत निर्मिती केली जात होती. घटनास्थळी अंदाजे आठ लाख पाच हजार ९५० रुपये किमतीचा माल आढळला.

सरोदे यांना विचारणा केली असता तीन महिन्यांपूर्वी युनिट सुरू केल्याची त्यांनी माहिती दिली. कारवाई तालुकास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख तथा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केली.

खत कारखान्यावर छापा मारला तेव्हा हे ग्रॅन्यूअल फॉर्ममध्ये एसएसपी व डीएपी खत आढळून आले. तेथेच ५६७ बॅगा आढळल्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT