Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

Rabi Sowing : सध्या रब्बी पेरणीला वेग आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी एक लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात सर्वाधिक ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली आहे. सध्या रब्बी पेरणीला वेग आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. पाच महिन्यात सरासरीच्या १०३ टक्के झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरले. तसेच भूगर्भातही जलसंचल वाढल्याने शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता.

यानुसार खते तसेच बियाणाचे नियोजन प्रशासनाने केले होते. शेतकऱ्यांनीही यंदा सर्वाधीक हरभरा पिकाला प्राधान्य दिले. जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक त्र्याऐंशी हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. तर साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर गहू, १२ हजार २१३ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.

यासोबतच रब्बी हंगामात पीक बदल म्हणून करडई, राजमा पिकाचे रब्बी हंगामात क्षेत्र वाढत आहे. यंदाची रब्बीतील पेरणी मागील काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक होण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणे अनुदानावर वाटप केले, त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. सोबतच मुबलक प्रमाणात खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून दिली

जिल्हातील वाढते रब्बी पेरणी क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागाच्या विविध योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनासाठी ठिबक व तुषारसंच घेण्यासाठी ८० टक्के अनुदान देण्यात येत असून याचा थेट परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीत दिसून येतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

रब्बीमधील पेरणी क्षेत्र

हरभरा ८३ हजार ५८४ हेक्टर

गहू ३ हजार ५४३ हेक्टर

रब्बी ज्वारी १२ हजार २१३ हेक्टर

रब्बी मका ४०८ हेक्टर

करडई २ हजार ९५९ हेक्टर

एकूण एक लाख पाच हजार ५१२ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT