Rabbi sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात ; ६३ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड

Rabbi Season : पुणे जिल्ह्यात रब्बीच्या कामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात रब्बीच्या कामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ६३ हजार ३७७ हेक्टर म्हणजे सरासरी २८ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तसेच गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून, एक ते दीड महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

सध्या खरीप हंगामातील भात पिके निसवण्याच्या व दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. मूग पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. सोयाबीन पीक दाणे पक्वतेच्या व काही ठिकाणी काढणी सुरू झालेली आहे. अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे. मका पिकाची काढणी सुरू असून, २५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झालेली आहे. भुईमूग पिकाची ५० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली असून उत्पादकतेत ५५ ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी लांबली आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र, हेक्टरमध्ये ः

पीक --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र

रब्बी ज्वारी ----- १,३४,३३६,-- ५२,२१६

गहू ----- ३९,८०३, --- ११२०

मका ----- १६,९४७, --- ६५६०

इतर रब्बी तृणधान्य --- २७१, -- १८

हरभरा --- ३४,३३०, -- ३१२४

इतर रब्बी कडधान्य --- ३८२९, -- ११९

करडई -- २३ -- २०६

तीळ -- ५ -- ०

जवस -- ११ -- ३

सूर्यफूल -- ६६ --- १२

इतर रब्बी गळीतधान्य --- ९१ -- ०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT