Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : पावसाच्या उघडिपीनंतर रब्बी पेरणी वाढणार

Post Monsoon Rain Update : जिल्ह्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी खरिपातील पेरणीचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Team Agrowon

Nanded News : सलग तीन दिवस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर नांदेडला गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी खरिपातील पेरणीचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील सोमवार, मंगळवार व बुधवारी मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाला. पहिल्या दिवशी १२ मंडलांत, तर दुसऱ्या दिवशी तीन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

या पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी या पिकांचे नुकसान झाले, तर रब्बीतील हरभरा व पेरणी केलेल्या गव्हाला बाधा झाली. पंरतु या मॉन्सूनोत्तर पावसाचा मात्र रब्बी पेरणी क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जमिनीत ओल राहिली नव्हती. परंतु मागील तीन दिवस झालेल्या पावसाने खरिपात पेरता येईल, एवढी ओल झाली आहे. यामुळे पुढील काळात हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू पेरणीला वेग येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT