Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Ambegaon Onion Cultivation : आंबेगाव तालुक्यात रब्बीच्या कांदा लागवडीला प्रारंभ

Onion Cultivation News : आंबेगाव तालुक्यातील कळंब, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, लौकी, महाळुंगे पडवळ आदी गावांत शेतकऱ्यांनी कांदा लागवडी सुरू केल्या आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : आंबेगाव तालुक्यातील कळंब, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, लौकी, महाळुंगे पडवळ आदी गावांत शेतकऱ्यांनी कांदा लागवडी सुरू केल्या आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

आंबेगाव तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. कांदा साठवणुकीसाठी हवेशीर अशा कांदा चाळीदेखील शेतकऱ्यांनी उभारल्या आहेत. सरासरी अर्धा-एकपासून ते दहा एकर क्षेत्रात कांदा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.

नगदी पैसे मिळवून देणाऱ्या कांदा पिकाच्या लागवडीची लगबग सध्या सुरू आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. त्यामुळे घोडनदी, उजवा, डावा कालवा, पोटचाऱ्या व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात उन्हाळ्यातही शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. गेल्या एक ते दोन दिवसांपासून बराखीत (कांदा चाळीत) साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.

चास (ता. आंबेगाव) येथील शमित बारवे, दत्तात्रय बारवे, विक्रम बारवे यांच्या शेतात सध्या कांदा लागवडीचा लगबग सुरू आहे. कळंब, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, लौकी, महाळुंगे पडवळ, साकोरे, चांडोली बुद्रुक, थोरांदळे आदी गावांतील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

चार एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली आहे. त्यासाठी एकरी २८ मजूर लागले. त्यांना ३०० रुपये प्रती मजूर या प्रमाणे मजुरी देण्यात आली. चार दिवस कांदा लागवड सुरू होती. सरासरी एकरी ८०० गड्डा कांदा रोपे लागली.

एकरी साधारणपणे १५ ते २० हजार रुपये खर्च झाला. लागवड हंगामाला जोमात सुरुवात झाल्याने कांदा रोपांच्या मागणीत आता वाढ झाली आहे, अशी माहिती चास येथील माजी उपसरपंच शिवाजी बारवे व विक्रम बारवे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT