Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Harvesting : रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात

Rabi Season : लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत रब्बी पिकांची काढणी जवळपास अंतिम टप्प्यात आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत रब्बी पिकांची काढणी जवळपास अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे उन्हाळी पीक सध्याच्या स्थितीला रोप अवस्थेत आहेत. उन्हाळी पिकात शेतकऱ्यांनी भुईमूग व मका पिकाला पसंती दिली आहे.

लातूर विभागाचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३,६३,९३० हेक्टर होते. परंतु प्रत्यक्ष पेरणी १५,९२,५८६.२१ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ११६.७६ टक्क्यांवर झाली.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३,७१,८५७, तर प्रत्यक्षात ३,९२,८१४.५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १०५.६४ टक्के आहे. ज्वारीचे पीक सध्या काढणी अवस्थेत असून ७० ते ८० टक्के ज्वारीची काढणी पूर्ण झाली आहे.

गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १,५६,५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात १,३०,४०६.९६ हेक्टर क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ८३.३२ टक्के आहे. पिकाची सध्या काढणी सुरू असून ७० ते ८० गहू पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७,८६,१२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात १० लाख ९ हजार १९ हेक्टर क्षेत्रांवर पेरणी झाली. त्याची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी १२८.३५ टक्के आहे.

पिकाची ८५ ते ९० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. करडई पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९,५३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३४,८४२.९८ हेक्टर क्षेत्रांवर पेरणी झाली. त्याची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत टक्केवारी १७८.४० टक्के असताना आहे.

पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे. पिकाची सध्या ७० ते ७५ टक्के पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. लातूर विभागाचे उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र ७१,७०० हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी ४३,३८६.७२ हेक्टरवर म्हणजे क्षेत्राच्या ६०.५१ टक्के वर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT