Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : रब्‍बी पिकांना पावसाचा फटका

Rabi Crop : रसायनी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्‍या पावसामुळे भात झोडणीची काम सुरू असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

Team Agrowon

Mumbai News : रसायनी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्‍या पावसामुळे भात झोडणीची काम सुरू असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

हाताशी आलेले पीक वाया जाऊ नये म्‍हणून ताडपत्री तसेच प्लॉस्‍टिकच्या मदतीने भाताचे भारे झाकण्यात आले. तर पाऊस सुरू होताच वासांबे-मोहोपाडा परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्‍याने नागरिकांची गैरसोय झाली. रब्‍बी हंगामातील लागवडीलाही पावसामुळे फटका बसला आहे.

बहुतांश शेतकऱ्यांची कापणीचे कामे पूर्ण झाली असून दिवाळीमुळे अनेकांनी कापणी केलेला भात शेतावर रचून ठेवला होता. तर काही ठिकाणी झोडणीला सुरुवात झाली होती.दरम्यान दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला होता. रविवारी (ता. २६ ) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्‍याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वैरण आणि पेंढा भिजल्‍याचे तळेगावातील शेतकरी नारायण पाटील यांनी सांगितले.

‘त्रिपुरारी’वरही पावसाचे सावट

रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा परिसरातील विविध मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी झाली. रविवारी पावसाच्या शिडकाव्यामुळे पावसाचे सावट होते.

रेवदंड्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिरात कच्च्या दोऱ्याचा काकडा पेटवून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मंदिरासमोरील दीपमाळा सजवण्यात आल्या होत्या, रांगोळी काढल्‍या होत्‍या. अनेकांनी सकाळीच मंदिरात दर्शन घेतले. विठ्ठल-रखुमाई मंदिर, गणपती मंदिर, नारायण मंदिर परिसरात दीपमाळांवर त्रिपूर लावले होते. चौलचे पुरातन गणेश मंदिर, पर्वतवासी दत्तमंदिर, भगवती देवी, रामेश्वर मंदिरात त्रिपूर लावल्‍याने परिसर उजळला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT