Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्र वाढणार

Rabi Season 2024 : परतीच्या पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर वाघाड,पुणेगाव, पालखेड तसेच कधी न लवकर भरणारे या वर्षी तिसगाव धरण शंभर टक्के भरले आहे.

Team Agrowon

Dindori News : तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदा शेवटच्या टप्प्यात मुसळधार पाऊस झाला असला तरी, सुरवातीला तीन महिने समाधान कारक पाऊस नसल्याने खरिपाचा हंगाम हातून गेला. मात्र मुसळधार पावसाने नदी, नाले ओहोळ खळखळून वाहू लागले आहेत.

त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेला तरी रब्बी हंगामातील पिकांच्या क्षेत्रात चाळीस टक्क्याने वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.परतीच्या पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर वाघाड,पुणेगाव, पालखेड तसेच कधी न लवकर भरणारे या वर्षी तिसगाव धरण शंभर टक्के भरले आहे.

तसेच करंजवण, ओझरखेड ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.त्यामूळे उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाईची झळ यावर्षी बसणार नाही.या धरणांवर फक्त दिंडोरी तालुकाच अवलंबून नाही तर येवला, निफाड, नांदगाव काही प्रमाणात कोपरगावचा भाग सुद्धा अवलंबून आहे.

पालखेड बंधाऱ्याची साठवण क्षमता ७५० एमसीएफटी असली तरी सध्या या धरणातून एक मोरी व डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. धरणांचा मृत साठा- १.७९ मीटर इतका असला तरी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मागील उन्हाळ्यात काही गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते.

त्यामुळे वरुण आलेला पाणीसाठा तत्काळ पालखेड धरणातून कादवा नदीला तसेच डाव्या व उजव्या कालव्यातून सोडून जाते. तिसगाव वगळता सर्व धरणांचा पाणी साठा या धरणात वर्ग करता येतो अशी रचना पालखेड धरणांच्या बाबतीत आहे.

वाघाड धरण हे पश्चिम पट्यात येत असल्याने या धरणावर २४ पाणी वाटप संस्था कार्यरत असून दिंडोरी व निफाड तालुक्यातील ओझरमिगचा परिसर ओलीताखाली येतो.करंजवण धरणातून नव्याने मनमाड पाणी योजना सुरू झाली आहे.तर ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील ५६ खेडी योजना सुरू आहे तसेच तालुक्यातील दिंडोरी व वणीकसबे आदी गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

SCROLL FOR NEXT