Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत ६०.३५ टक्के मतदान झाले होते. त्यात दापोलीत ५९.२ टक्के, गुहागर ५९.५ टक्के, चिपळूण ६३.५१ टक्के, रत्नागिरी ५९ टक्के, राजापूर ६१.५ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर उन्हामुळे मतदारांनी विश्रांती घेतली आणि पुन्हा तीननंतर मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण भागात महिलांची उपस्थिती उत्स्फूर्त होती.
पावसामुळे शेतकऱ्याचे कापणी आणि झोडणीचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे पुढील सर्वच नियोजन विस्कळित झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवाळीवेळी झोडणी केल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करतो.
त्यादृष्टीने शेतकऱ्याने नियोजन केले असले तरी पावसाने हे वेळापत्रक बिघडवले. त्यामुळे बुधवारी (ता. २०) मतदान असूनही पहाटेच शेतकरी झोडणीसाठी शेतात गेल्याचे पाहायला मिळाले.
पावसामुळे कापलेले भात न झोडताच रचून ठेवलेले होते. हे भात पावसाच्या उघडिपीमुळे शेतकऱ्यांनी शेतातच झोडायला घेतल्याचे शेतात पाहायला मिळाले. पाच ते सहा जण मिळून एकत्रितपणे हे काम सुरू होते.
एकीकडे भात झोडणी सुरू असताना दुसरीकडे रब्बीसाठी नांगरणी, कडधान्याची पेरणी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. झोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काहीजण मतदान करून आले होते, तर काहीजण दुपारी मतदानाला जाणार असल्याचे सांगितले.
अशा असतील प्रमुख लढती
दापोली ः महायुतीचे योगेश कदम विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय कदम
चिपळूण ः महायुतीचे शेखर निकम विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत यादव
गुहागर ः महाविकास आघाडीचे भास्कर जाधव विरुद्ध महायुतीचे राजेश बेंडल
रत्नागिरी ः महायुतीचे उदय सामंत विरुद्ध महाविकास आघाडीचे बाळ माने
राजापूर ः महाविकास आघाडीचे राजन साळवी विरुद्ध महायुतीचे किरण सामंत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.