Fertilizer Use  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer : खतांच्या संतुलित वापरातून गुणवत्तापूर्ण उत्पादन शक्य

Crop Production : पिकाला १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन शिफारशीनुसार खतमात्रा दिल्यास अतिरिक्त खर्च कमी होईल.

Team Agrowon

Nashik News : पिकाला १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन शिफारशीनुसार खतमात्रा दिल्यास अतिरिक्त खर्च कमी होईल.

याशिवाय जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होते. यासाठी रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खतांची जोड देऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन शक्य आहे, असे मत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कृषिविद्या तज्ज्ञ अनिल येशे यांनी मांडले.

सावळी (ता. निफाड) येथे मंगळवारी (ता. १६) अॅग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रमात ‘भाजीपाला पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व नियोजन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी येशे बोलत होते.

व्यासपीठावर सरपंच छाया बोडके, पोलिस पाटील अरुण बोडके, ग्रामसेवक राहुल सोनार, निफाड खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक चंद्रकांत सोमासे कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, कोरोमंडल इंटरनॅशनलचे विभागीय व्यवस्थापक समाधान बुधवंत उपस्थित होते.

येशे म्हणाले, की मानवाप्रमाणेच माती सजीव असून तिचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे. जोपर्यंत जमिनीत कमी अधिक काय आहे, याची कल्पना येत नाही. तोपर्यंत खतावर अतिरिक्त खर्च होणारच आहे. त्यामुळे माती परीक्षण महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी खताची निवड पिकाच्या अवस्थेनुसार करावी. जमिनीत सेंद्रिय कर्ब पातळी कमी झाली आहे, त्यामुळे सेंद्रिय खतांचाही वापर गरजेचा झाला आहे. संतुलित प्रमाणात रासायनिकसोबत जैविक खताचा वापर त्यांनी सांगितला. तसेच माती परीक्षण नमुना घेण्याची पद्धत या वेळी समजावून सांगितली.

कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी कृषी योजनांची माहिती दिली. कृषी सहायक सुरेश गांगोडे, कोरोमंडल इंटरनॅशनलचे विपणन अधिकारी अमित खांदे, जय गुरुदेव कृषी सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र बोडके उपस्थित होते. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित खांदे यांनी आभार मानले, तर ‘ॲग्रोवन’चे नाशिक प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती शक्य

शेतीतील तंत्रज्ञान बदलत आहे. त्यानुसार उपयुक्तता तपासून शेतकऱ्यांनी बदलले पाहिजे. बदल स्वीकारून पुढे जाणे काळाची गरज आहे. नॅनो डीएपी बाजारात उपलब्ध असून त्याचा वापर पिकावर फवारणीद्वारे करणे शक्य आहे. याचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊन आर्थिक सक्षमता येण्यास मदत होते, असा सल्ला कोरोमंडल इंटरनॅशनल लि.चे विभागीय व्यवस्थापक समाधान बुधवंत यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT