Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गायीच्या खरेदी दूध दरात १ रूपयांनी वाढ; राज्यातील सहकारी, खाजगी दूध संघांचा निर्णय

Purchase Price Cow Milk : शासनानेही १ डिसेंबरपासून गाय दूध अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. दूध संघांनी दरात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Cow Milk Rate : देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर आणि बटरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रूपयांची वाढ केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा या दोन दूध संघांनी वाढ केली नाही. ज्या दूध संघांनी दरवाढ केली आहे, त्या दूध संघांकडून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर दिला जाणार आहे. यापूर्वी गोकुळ आणि वारणा दूध संघाने दर वाढवून दिल्याने त्यांनी खरेदी दरात वाढ केली नाही.

फेब्रुवारीनंतर खरेदी दरात वाढ शक्य

फेब्रुवारी महिन्यात दुधाबरोबरच पावडर व बटरची मागणी वाढते. याचा अंदाज घेऊन दूध खरेदी दरात वाढ होते. मागील वर्षभरापासून गाय दूध उत्पादकांचा दरावरून मोठा संघर्ष सुरू आहे. येत्या महिन्याभरात दूध दरात वाढ अपेक्षित आहे.

शासनानेही १ डिसेंबरपासून गाय दूध अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. दूध संघांनी दरात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यात, गेल्या महिन्याभरापासून देशातंर्गत बाजारपेठेत दूध पावडर व बटरच्या दरात थोडीसी वाढ झाल्याने संघांनी खरेदी दरात वाढ करायचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा होताच खरेदी दरात कपात

विधानसभा निवडणुका होताच पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात केली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या राजारामबापू दूध संघ, गोकुळ, वारणा, भारत डेअरीसह दूध संघांचे प्रतिनिधी यांनी ही बैठक बोलवून हा निर्णय घेतला होता.

राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ पासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर २८ रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध संघ ३३ रुपये दर देत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT