Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : सिंधुदुर्गात ४७ हजार ६६१ क्विंटल भातखरेदी

Procurement Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ भातखरेदी केंद्रांवर आतापर्यंत ४७ हजार ६६१ क्विंटल भातखरेदी झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ५० शेतकऱ्यांनी भातविक्री केली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ भातखरेदी केंद्रांवर आतापर्यंत ४७ हजार ६६१ क्विंटल भातखरेदी झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ५० शेतकऱ्यांनी भातविक्री केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी असलेली मुदत बुधवारी (ता. ३१) संपली असून ती वाढविण्याची मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ४४ भातखरेदी केंद्रे मंजूर आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर भातखरेदी सध्या सुरू आहे. यावर्षी भातपीक कापणीला पावसामुळे विलंब झाला. त्यामुळे जिल्ह्यात भात खरेदीला देखील काहीसा विलंब झाला आहे. तालुका खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भातखरेदी केली जात आहे.

जिल्ह्यातील ३ हजार ५० शेतकऱ्यांनी आतापर्यंत भातविक्री केली आहे. आतापर्यंत ४७ हजार ६६१ क्विटंल भातखरेदी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्याप ५० टक्केदेखील भातखरेदी झालेली नाही. भातखरेदीपूर्वी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते.

१५ जानेवारीपर्यत असलेली मुदत वाढवून ३१ जानेवारी करण्यात आली होती. ही मुदतदेखील बुधवारी संपली. मुदत वाढवावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

भातखरेदी केलेल्या ३ हजार ५० पैकी १ हजार ७०० शेतकऱ्यांचे ६ कोटी ६४ लाख १७ हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ५ कोटी ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे बँक खाते पडताळणी होताच त्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली जाणार आहे.
डी. आर. पाटील, मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT