Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : रत्नागिरी जिल्ह्यात १२,३९२ क्विंटल भात खरेदी

Paddy Procurement Center : दि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. एकूण १२ हजार ३९२ क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या भाताला शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. शेतकऱ्यांना स्वत:पुरता भात ठेवून उर्वरित भात विक्री करून अर्थप्राप्ती करता येता येते. त्यानुसार दि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. एकूण १२ हजार ३९२ क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात येते. शेतकऱ्यांकडील भात खरेदी करून खरेदी केलेल्या भाताचा ई-लिलाव करून भरडाईसाठी पाठविण्यात येते.

भरडाईनंतर तांदूळ रास्तदर धान्य दुकानावर विक्रीसाठी पाठविण्यात येतो. भात विक्रीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. शेतीचा सात-बारा, आठ अ, शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक यांची प्रत जोडावी लागते. शेतीचा फोटोही अपलोड करावा लागतो. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना भात विक्री करता येते

१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आता ३१ जानेवारीपर्यंत भात विक्री करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आतापर्यंत १२ हजार ३९२ क्विंटल भात विक्री करण्यात आली आहे. गतवर्षी ३३२४०.८० क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतात. यावर्षी प्रतिक्विंटल २,१८३ रुपये दर देण्यात आला होता.

यावर्षी अद्याप १२ हजार ३९२ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली असली तरी गतवर्षीइतके भात संकलन आठवडाभरात होणे अशक्य आहे. यावर्षी पावसाअभावी भात उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याने गतवर्षीएवढे भात संकलन होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT