Purandar Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Purandar Irrigation Scheme : ‘पुरंदर उपसा’ होणार गतिमान

Agriculture Irrigation : उपसा सिंचन योजनांसाठी मोठ्या अश्‍वशक्तीचे विद्युत पंप लागत असल्याने या योजनांवर वीजबिलाचा जादा भार पडून पर्यायाने शेतकऱ्यांना ज्यादाची पाणीपट्टी भरावी लागते.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई शिरसाई योजनांसारख्या उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याकरिता ४२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने पुरंदर, बारामती, दौंड, हवेलीच्या शेतकऱ्यांसाठी वरदायी असणारी पुरंदर उपसा सिंचन योजना निश्चिश्‍चितपणे गतिमान होणार आहे.

उपसा सिंचन योजनांसाठी मोठ्या अश्‍वशक्तीचे विद्युत पंप लागत असल्याने या योजनांवर वीजबिलाचा जादा भार पडून पर्यायाने शेतकऱ्यांना ज्यादाची पाणीपट्टी भरावी लागते. तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याने योजनादेखील सुरळीतपणे चालण्यामध्ये अडचणी येतात.

या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जा करणाच्या माध्यमातून सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी या योजनेवरती ४२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. याचा मोठा फायदा हा पुरंदर उपसा सिंचन योजनेला होणार आहे.

पुरंदर, बारामती, दौंड, हवेली या चार तालुक्यांतील २५ हजार हेक्टरवरून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणारी पुरंदर उपसा सिंचन योजना ही सहा टप्प्यांमध्ये चालते. पूर्ण क्षमतेने सहा ही टप्प्यामध्ये ही योजना चालल्यास पहिल्या टप्प्यात २९२१ अश्‍वशक्तीचे तीन पंप आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये २७७४ अश्‍वशक्तीचे तीन पंप आहेत.

तिसऱ्या टप्प्यामध्ये २८४२ अश्‍वशक्तीचे तीन पंप आहेत. चौथ्या टप्प्यातही तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच २८४२ अश्‍वशक्तीचे तीन पंप आहेत. तेथून पुढे शिंदवणे घाटावरील पंप हाउसवरून माळशिरस व राजेवाडी वितरिकेच्या माध्यमातून बारामती तालुक्यामध्ये प्रवाहाने सायपनद्वारे पाणी जात असले तरी पाचव्या टप्प्यामध्ये दिवे वितरिकेसाठी ५६० अश्‍वशक्तीचे दोन पंप आहेत व सहाव्या टप्प्यात ११० अश्‍वशक्तीचे दोन पंप आहेत.

योजना अखंडितपणे चालण्यास मदत

योजनेला एक एमसीएफटी पाण्यासाठी २०९३७ रुपये एवढे पैसे भरावे लागत आहे. सौरऊर्जा करण्याच्या माध्यमातून हे सर्व पंप जर सौर ऊर्जेवर कार्यान्वित झाल्यास त्याचा निश्‍चित लाभ हे दर कमी होण्यास होणार आहे.

तसेच वारंवार विद्युत पुरवठा नादुरुस्तीमुळे योजना बंद होण्याने योजनेत येणारी अडथळे नाहीसे होऊन, योजना अखंडितपणे चालण्यास मदत होणार आहे. यामुळे योजना शेतकऱ्यांना चालवण्यास परवडण्याबरोबरच गतिमान देखील होणार आहे.

उपसा सिंचन योजनांवर सर्वाधिक खर्च हा विद्युत बिलावर होतो. सौरऊर्जेच्या माध्यमातून पुरंदर उपसा योजना कार्यान्वित झाल्यास निश्‍चित त्याचा लाभ होणार असल्याने सौरऊर्जा करणाचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे.
- विजय कोलते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT