Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Terror : वाघ जेरबंद करण्याचे आव्हान पुण्याच्या पथकाकडे

Tiger Rescue : येडशी अभयारण्यात वाघाच्या शोधासाठी तब्बल १५ दिवसांपासून प्रयत्नशील असलेली ताडोबाचे पथक अखेर माघारी परतले आहे.

Team Agrowon

Solapur News : येडशी अभयारण्यात वाघाच्या शोधासाठी तब्बल १५ दिवसांपासून प्रयत्नशील असलेली ताडोबाचे पथक अखेर माघारी परतले आहे. आता पुणे येथून तुहीम यांच्या नेतृत्वाखाली सात जणांची नवीन रेस्क्यू पथक येडशी येथे दाखल झाले असून, वाघाला जेरबंद करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

या पथकाने येथे दाखल होताच, येडशी अभयारण्याजवळील वडजी (जि. धाराशिव) शिवारातील वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला असून, वासरावर हल्ला झालेल्या ठिकाणाचीही पाहणी केली.

ताडोबाचे पथक आणि वनविभागाने केलेल्या व्यापक प्रयत्नानंतरही वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही. वाघाने दोन-तीन दिवसांच्या फरकाने विविध ठिकाणी जनावरांवर हल्ले केले आहेत.

त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अशा परिस्थितीत पुण्याहून आलेल्या रेस्क्यू पथकाला वाघाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून त्याला जेरबंद करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव पश्‍चिम) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, वनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी येडशी अभयारण्याला भेट दिली. त्यांनी वाघाच्या शोध मोहिमेचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT