Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: पुणे बाजार समितीत दुचाकी प्रवेशबंदीवरून संचालकांमध्ये ‘तू तू-मैं मैं’

Vehicle Ban Parking Controversy: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुचाकी आणि बिगर शेतीमालाच्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदीवरून संचालकांमध्ये गोंधळ सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेले निर्णय विरोधामुळे मागे फिरवले जात असून, यामुळे बाजार आवारात वाद विकोपाला गेला आहे.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे घेतलेले निर्णय फिरवले जात आहेत. यामुळे बाजार समितीला शिस्त राहिली नसून, काही अननुभवी संचालक धाकदपटशाचा वापर करत निर्णय लादत असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. दरम्यान दुचाकी आणि बिगर शेतीमालाच्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी वरून शुक्रवारी (ता. २८) होणारी बैठक एका अडत्याच्या निधनामुळे रद्द करण्यात आली.

बाजार समितीमध्ये दुचाकींसह, बिगर शेतीमाल वाहतुकीच्या वाहनांना मुक्त प्रवेशामुळे वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. याचा परिणाम खरेदी झालेला शेतीमाल लवकर किरकोळ बाजारात जात नसल्याने पुढील विक्रीवर विपरित परिणाम करणारा होता.

यामुळे वाहतूक कोंडीला भाजीपाला खरेदीदार आणि टेम्पो चालक वैतागले होते. दरम्यान आंब्याचा हंगाम तोंडावर आला असताना, वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली होती. यामुळे आंबा हंगामाला देखील फटका बसण्याची धोका आंबा आडतदारांनी व्यक्त केला होता.

रविवारी (ता. २३) प्रचंड वाहतूक कोंडी, तसेच काही अडत्यांनी रस्त्याच्या मधोमधच आंब्याच्या पेट्या उतरविल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. या सर्व पार्श्‍वभूमीवर दुचाकी आणि बिगर शेतीमालाच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी केल्याचा निर्णय सभापतींसह काही संचालकांनी घेतला. मात्र या निर्णयाला काही विरोधी संचालकांनी विरोध केला. यामुळे याप्रश्‍नी संचालकांमध्येच ‘तुतू-मैंमै’ सुरू आहे.

एका संचालकाची ‘कोंडी’

वाहन प्रवेश बंदीचा निर्णय एका संचालकाच्या दबावामुळे घेतल्याची चर्चा बाजार आवारात आहे. हा संचालक पार्किंग ठेकेदारीसाठी प्रसिद्ध असून, स्वतःचा पार्किंगचा व्यवसाय वाढावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. यामुळे विविध संचालकांनी एकत्र येत, त्यांची ‘कोंडी’ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Plough Selection: जमिनीच्या मशागतीसाठी निवडा योग्य नांगर

Dairy Farming Technology: शेतकऱ्याच्या दारात पन्नास लिटर दूध देणारी गाय

Chikotra Water Project: समन्यायी पाणीवाटपाचा पथदर्शक प्रकल्प

M.S. Swaminathan Award: डॉ. चेरुकुमल्ली श्रीनिवासराव यांना स्वामिनाथन पुरस्कार जाहीर

Water Crisis Planning: कमी पाऊस : चिंता की चिंतन

SCROLL FOR NEXT