Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Traffic Issue: पुणे बाजार समितीत दुचाकी प्रवेशावर बंदी

Two-Wheeler Entry Ban: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. बाजारात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता दुचाकींना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकांनी लावलेली शिस्त मोडीत काढत, आपण काही तरी क्रांतिकारी निर्णय घेत असल्याच्या आविर्भावात, वाहतुकीचा खोळंबा केलेल्या संचालकांना आता उपरती आली आहे. बाजार आवारात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता दुचाकींना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाजार समितीवर अनेक वर्षे प्रशासक राज होते. प्रशासक राजवटीमध्ये बाजार आवारात वाहतुकीला आणि शेतीमाल विक्रीसाठी शिस्त होती. मात्र संचालक मंडळ आल्यानंतर सर्व व्यवस्था आणि शिस्तीला फाटा दिला. बाजार आवारातील शेतीमालाला उठाव मिळावा, वेळेवर शेतीमालाची विक्री व्हावी या स्वार्थी हेतूने घाऊक बाजारात, किरकोळ खरेदीदारांना काही संचालकांच्या हट्टापायी दुचाकींसह प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे किरकोळ आणि घरगुती खरेदीदार थेट गाळ्यांवर वाहने आणू लागले. परिणामी बाजार आवारात वाहतूक कोंडी वाढू लागली. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध भागनिहाय विविध संचालकांच्या बगलबच्च्यांच्या सोयासाठी स्वतंत्र सुरक्षा एजन्सीचा निर्णय घेण्यात आला. विविध एजन्सींची नियुक्ती करून देखील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिक जटिल झाला.

विविध एजन्सींची नियुक्ती करून देखील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत नसल्याने आणि आता तोंडावर आंबा हंगाम सुरू होत असल्याने अखेर संचालक मंडळाला उपरती झाली असून, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, आता दुचाकींना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेशिस्त पार्किंग

निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या सुरक्षा एजन्सीला सुरक्षा आणि वाहतूक शिस्त लावण्याचे काम दिले असताना, वाहतूक कोंडी तुलनेने कमी होती. मात्र संचालक मंडळ आल्यापासून बेशिस्त पार्किंग आणि वाहन चालकांची संख्या वाढली आहे. कोणीही, कुठेही वाहन पार्किंग करत असल्याचे चित्र आहे.

तर प्रवेशद्वार क्रमांक एक जवळील डाव्या हाताला असणारे आरक्षित वाहनतळ बेवारस झाले असून, त्या ठिकाणी कोणीही बेशिस्तपणे वाहन लावून अडचणी निर्माण करत आहेत. याकडे प्रशासन आणि संचालकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT