Biogas Slurry  Agrowon
ॲग्रो विशेष

Biogas Plant : जिल्हा दूध उत्पादक संघ उभारणार बायोगॅस प्रकल्प

Latest Agriculture News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने अनुदानित तत्त्वावर शेतकऱ्यांच्या घरी बायोगॅस प्रकल्प साकारणार असल्याचे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक तानाजी जगताप यांनी परिंचे (ता. पुरंदर) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सांगितले.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने अनुदानित तत्त्वावर शेतकऱ्यांच्या घरी बायोगॅस प्रकल्प साकारणार असल्याचे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक तानाजी जगताप यांनी परिंचे (ता. पुरंदर) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सांगितले.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम धुमाळ, नीलेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जिल्हा दूध संघांच्या वतीने अनुदानित तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये कडबा कुट्टी मशीन, लॅक्टोमीटर, दूध कॅन, पशुखाद्य, बायोगॅस स्लरी, पशुधन औषधे, मिल्किंग मशीन, मुरघास बॅग व चारा पिकांची माहिती देण्यात आली.

तानाजी जगताप म्हणाले की, दिवसेंदिवस घरगुती गॅसच्या किमती वाढत आहेत बायोगॅस हा शेतकरी कुटुंबाला एक पर्याय असून उपलब्ध शेणाच्या माध्यमातून जळतणाची गरज भागविता येणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दूध संघाच्या वतीने गेल्या वीस वर्षांत पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण लाभाच्या योजना सुरू केल्या असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांनी सांगितले. परिंचे परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन दूध उत्पादन करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

जिल्हा संघाचे डॉ. अहिरे व डॉ. वीर अमोल सोंडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी काळदरी गावचे माजी सरपंच अंकुश परखंडे, हरिदास खैरे, हनुमंत पवार, सुधीर धुमाळ, परिंचे सोसायटीचे अध्यक्ष सुशीलकुमार जाधव, अजय जाधव, उल्हास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT