Millet Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Sowing News : जळगावमध्ये कडधान्य पेरणीला फटका शक्य

Sowing Update : सध्या ऐन पावसाळ्यात तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागले आहे. वातावरणात उकाडा कायम आहे. त्यामुळे पाऊस येणार तरी कधी, याची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच भेडसावू लागली आहे.

Team Agrowon

Jalgaon Pulses News : जून महिना सुरू होऊन १६ दिवस झाले, तरीही पावसाची ओढ कायम आहे. मृग नक्षत्र निघून आठवडा झाला, तरीही मृगातील दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.

पावसाचे आगमन आणखी लांबल्यास उडीद आणि मुगाच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या ऐन पावसाळ्यात तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागले आहे. वातावरणात उकाडा कायम आहे. त्यामुळे पाऊस येणार तरी कधी, याची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच भेडसावू लागली आहे.

जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. खरिपाच्या पेरण्यांवर शेतकऱ्यांची दिवाळी अवलंबून असते. खरिपासाठी मृग नक्षत्रातील पाऊस उपयुक्त मानला जातो.

यंदा मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन नऊ दिवस झाले तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही. सुरुवातीच्याच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास शेतकरी जूनअखेरपर्यंत उडीद, तूर व मुगाची पेरणी करतात. त्यानंतर पेरणी करण्याचे शक्यतो टाळतात.

जुलैअखेरपर्यंत तूर आणि सोयाबीनची पेरणी करतात. पाऊस लांबला, तर उडीद आणि मुगाच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पेरणीयोग्य अपेक्षित

क्षेत्र दृष्टिक्षेपात

खरिपातील प्रमुख पिके - सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कापूस : ५ लाख १ हजार ५६८

सोयाबीन : २९ हजार ६३८

तूर : १६ हजार ५०३

मका : ९८ हजार २५

उडीद : २६ हजार ३१२

मूग : २८ हजार ९६

ज्वारी : ४४ हजार ७३३

बाजरी : १५ हजार ७७४

कडधान्यवर्गीय पिके : ७१ हजार ९८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT