Farmer Income  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Income : डाळ मिल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ शक्य

Pulses Processing : शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे. डाळ मिल प्रक्रिया उद्योग हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुल्यवर्धनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात चेन्नई येथील नॅशनल ॲग्रो फाउंडेशन आणि कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय डाळ मिल प्रशिक्षण झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे होते. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, चन्नई येथील नॅशनल ऍग्रो फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत देवरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास साळवे आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. गणेश शेळके उपस्थित होते.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कंबळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, आष्टी आणि यशवंत शेतकरी उत्पादक कंपनी, अंबाजोगाई या दोन प्रमुख शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना आणि प्रतिनिधी शेतकऱ्यांना डाळ प्रक्रिया तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान देणे हा आहे.

या वेळी डॉ. सचिन नलावडे म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या धोरणात शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतात. हे प्रशिक्षण या कंपन्यांच्या सदस्यांना डाळ प्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापनाची माहिती देऊन त्यांना अधिक सक्षम बनवेल. ज्यामुळे ते सामूहिकपणे अधिक नफा कमवू शकतील.

डॉ. कैलास कांबळे म्हणाले, की या प्रशिक्षणामध्ये सहभागींना डाळ मिल यंत्रांची कार्यपद्धती, डाळींची गुणवत्ता तपासणी, प्रक्रिया करताना घ्यायची काळजी आणि तयार मालाच्या विक्रीचे नियोजन याबाबत सखोल माहिती दिली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास साळवे यांनी केले. डॉ. विक्रम कड यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT